
सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 म्हाराठीवाडी शाळेत निपुण महाराष्ट्र अंतर्गत चावडी वाचन व गणन उपक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील सर्वच विद्यार्थी चावडी वाचनात रमली. अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्तीसाठी निपुण महाराष्ट्र अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
निपुण भारत योजनेअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडून निर्देश देण्यात आले आहेत. मुलांमध्ये इयत्तेनुसार वाचन व लेखन क्षमता नसल्याचे शाळा भेटीतून दिसून येत आहे. त्यानुसार, निपुण भारत अभियानाला पूरक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत.मुलांमध्ये इयत्तेनुसार वाचन व लेखन क्षमता नसल्याचे शाळा भेटीतून दिसून येत आहे. त्यानुसार, निपुण भारत अभियानाला पूरक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे चावडी वाचन व गणन उपक्रम घेण्याचे नियोजित आहे.
यानुसार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 म्हाराठीवाडी शाळेत वाचन व गणन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षक जावेद तांबोळी यांनी या उपक्रमाचा उद्देश उपस्थित नागरिकांना, पालकांना समजावून सांगितला. यावेळी सर्वच मुलांनी वाचन, लेखन केले. दरम्यान ए पी. जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण तसेच यशवंत शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रॉन्झ मेडल मिळवल्याबद्दल अथर्व गावडे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सायली गावडे, उपाध्यक्ष रवींद्र गावडे, प्रदीप गावडे, पालक आणि वाडीतील गावकरी उपस्थित होते.