श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत 'चावडी वाचन'

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 08, 2025 17:43 PM
views 150  views

देवगड  :  निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत “ चावडी वाचन “ कार्यक्रमाचे जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजन करण्यात आले होते.

भारत सरकारने निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६ -२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून त्याचाच एक भाग म्हणून निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत “ चावडी वाचन “ कार्यक्रमाचे जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत ५ मार्च रोजी आयोजन करण्यात आले.

 याप्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष -प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक सुनील जाधव , पालक अनुश्री अ.बापट पूजा शिवगण , समीरा राऊत , सुजित फडके, मोहन सनगाळे प्रदीप घाडी आदि मान्यवर उपस्थित होते. चावडी वाचन कार्यक्रमात शब्द पट्टया व वाक्य पट्टया द्वारे मराठी वाचन व लेखन समीरा राऊत यांनी करून घेतले तर गणित विषयाचे अंकपट्ट्याद्वारे अंकवाचन व लेखन सुजित फडके यांनी करून घेतले.

५ मार्च २०२५ ते ३० जुन २०२५ पर्यंत हा कालावधी कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालखंडात दर १५ दिवसांनी “ चावडी वाचन “ घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाला समितीचे अध्यक्ष प्रसाद मोंडकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित होणे किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले तर आभार सुजित फडके यांनी केले.