
सावंतवाडी : चराठ्या राष्ट्रवादी पुरस्कृत श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मारीता बावतीस फर्नांडिस व आमचे चारही सदस्य निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला. तर चराठे वासीय मागील सत्ताधाऱ्यांंना पाणी पाजणार, तर राष्ट्रवादीला संधी देणार असल्याचा विश्वास पुंडलिक दळवी यांनी केला. यावेळी हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, नंदू साटेलकर पप्पू शेख, नियाज शेख, आदी उपस्थित होते.