कणकवली मंडळ कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त फेरफार अदालत

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 04, 2023 14:11 PM
views 162  views

कणकवली : तालुक्यात महसूल सप्ताह निमित्त फेरफार अदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी  कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  मंडळ अधीकारी कार्यालय कणकवली येथे महसूल दिनानिमित्त फेरफार अदालत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 11 जणांच्या वारस नोंदीची मंजुरी करून सातबारा व फेरफारचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी सुवर्णा कडूलकर, कीर्ती कांबळे, तलाठी श्रद्धा कोरगावकर आणि कोतवाल यांच्यासह सर्व खातेदार उपस्थित होते.

 सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महसूल सप्ताह निमित्त सर्व ठिकाणी महसुली कामे ही जलद गतीने होत आहेत त्या निमित्तानेच कणकवलीतील मंडळ अधिकारी कार्यालय का अंतर्गत तलाठी कोतवाल यांनी मंडळाचे काम चांगले केले आहे. त्यामुळे महसूल दिनी या सर्वच कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता .यामध्ये इपिक पाहणी बाबत खातेदारांना माहिती देण्यात येत आहे त्यानंतर घर घर दाखले वाटप केले जात आहेत. तसेच सलोखा योजनेबाबत माहिती देखील दिली जात आहे.

आज वारस तपास कामी कॅम्प लावून सदर वारस तपास मोहिमेत 11 अर्ज प्राप्त झाले सदर अर्जाप्रमाणे तलाठी यांनी गाव दप्तरी नोंदी केल्या फेरफार अदालतीमध्ये निर्णीत झालेल्या नोंदीचे दाखले  तहसीलदार दीक्षांत देशपांडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी कणकवली मेघनाथ पाटील यांच्या हस्ते सात बारा आठ अ फेरफार व दाखले यांचे वाटप करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईचे अनुदान धनादेश देखील सदर महसूल सप्ताहचा निमित्ताने देण्यात आले. शासन आपल्या दारी येत असल्या बाबत शेतकऱ्याचा विश्वास वाढला असून त्यामुळे महसूल विभाग असे विविध कार्यक्रम राबवित असल्यामुळे महसूल खात्याची प्रतिमा जनमानसात उंचावत आहे.