चंद्रभागेतीरी 'विठ्ठल' स्नान !

Edited by: विनायक गावस
Published on: July 03, 2023 13:52 PM
views 253  views

सावंतवाडी : कोकणातील प्रतिपंढरपूर सावंतवाडीतील विठ्ठल-रखुमाई आषाढी एकादशी निमित्त सुरू असलेल्या  सप्ताहाची सांगता चंद्रभागेच्या तीरावर झाली. भटवाडी येथील चंद्रभागा तिरावर विठ्ठलाची पालखी पोहचली. यावेळी चंद्रभागेतीरी विठ्ठल स्नान पार पडल. 

हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यानंतर भटवाडी येथील विठ्ठल मंदिरात भजन, आरतीनंतर सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त उपस्थित होते.