चाफेड सरपंच किरण मेस्त्री - ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांना गोवा सरकारचा पुरस्कार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 26, 2024 13:28 PM
views 199  views

देवगड : गोवा सरकार पी डब्लू डी स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेलगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे चाफेड गावचे सरपंच किरण मेस्त्री आणि ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या सोहळ्याचे वितरण रविवार २६ मे रोजी दुपारी १२ वा. गोवा येथे होणार आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

चाफेड सरपंच किरण मेस्त्री, ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांच्या विकासकामे व विविध शासकीय योजना अंमलबजावणी याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांच्याकडून अभिनंदन पत्र प्रधान करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा गोवा-हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे २६ मे रोजी दु. १२ वा. होणार आहे.