
सावंतवाडी : सावंतवाडी शहर हद्दीतील जमिन घर व इतर मालमत्तेचे सात-बारा व इतर दाखले सावंतवाडी शहरामध्येच मिळावेत अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.
ते म्हणाले, सावंतवाडी शहरामध्ये चराठे गाव लगत असल्याने सर्व कागदपत्रे आणण्यासाठी तलाठी चराठे येथे जावे लागत आहे. सावंतवाडी शहर हद्दीमध्ये काही भाग चराठे म्युनिसिपल हद्द असे असल्याने शहराचा काही भाग हा तलाठी कार्यालय चराठे येथे असल्यामुळे बऱ्याच लोकांना तलाठीसाठी चराठे येथे हेलपाटे मारावे लागतात. बऱ्याच वेळा तलाठी भेटत नाहीत. त्यामुळे लोकांची परवड होते. जेष्ठ नागरीक, वयस्कर व महिला यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे सावंतवाडी शहर हद्दीतील तलाठीकडील सर्व कागदपत्रे सावंतवाडी शहरातच मिळावी. यासाठी सावंतवाडी तलाठी कार्यालयातच उपलब्ध करुन शहरवासियांना त्यांचे कागदपत्रे व इतर दाखले मिळण्यासाठी सोयीस्कर होईल अशी मागणी श्री भोगटे यांनी केली.