
वैभववाडी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज (ता. १७) वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीला भेट दिली. इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. या भेटीमुळे इमारतीच उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैभववाडी पंचायत समितीच्या इमारतीच बांधकाम दहा वर्षांपासून सुरू आहे.ही इमारत कामाच्या दर्जामुळे वादग्रस्त ठरली होती.सुरवातीला इमारत बांधकाम पुर्ण झाल होत.मात्र इमारतीला लागलेल्या गळतीमुळे यामधील प्रवेश रखडला होता.त्यानंतर या इमारतीवर छप्पर बांधकामासाठी नवीन निधी मंजूर करण्यात आला होता.सध्या इमीरतीच छप्पर, वीज, पाणी, संरक्षण भिंतीसह रंगरंगोटीची कामे पुर्णत्वास गेली आहेत. तसेच येथील कार्यालयांमध्ये लागणार फर्निचर बनविण्याच काम अंतिम टप्प्यात आले आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत या इमारतीच उद्घाटन होण्याची शक्यता आहे.त्या दृष्टीने प्रशासनही कामाला लागले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी यांची ही भेट असण्याची शक्यता आहे.
श्री. खेबुडकर यांनी आजच्या भेटीदरम्यान पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, उपअभियंता पंडितराव महाले, वैभववाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर. डी. जंगले पंचायत समितीचे अधीक्षक श्री. देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.