
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची बदली झाली असुन, मंत्रालयीन सहसचिव मकरंद देशमुख हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची बदली झाली असली तरी त्यांना कोणत्याही पदावर अध्यापन नेमणूक देण्यात आलेली नाही.