गॅसचा तुटवड्यावर केंद्र सरकारचा 'प्लॅन-बी' !

नागरिकांना दिलासा मिळणार
Edited by: विनायक गांवस
Published on: March 11, 2026 16:34 PM
views 84  views

नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात निर्माण होऊ शकणारे एलपीजी संकट लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने आपला 'प्लॅन-बी' कार्यान्वित केला आहे.

गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अल्जीरिया यांसारख्या देशांकडून एलएनजी आणि एलपीजीचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय रिफायनरींनी एलपीजीच्या घरगुती उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी रांगेत उभे राहण्याची किंवा तुटवड्याची भीती बाळगण्याची गरज भासणार नाही.