सेंट्रल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के

Edited by:
Published on: May 13, 2025 17:48 PM
views 44  views

सावंतवाडी : मर्कझी जमात, बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी शैक्षणिक वर्ष २०२ ४ - २५ एस् . एस् . सी परिक्षेत  प्रविष्ठ झालेल्या सर्व  विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली. त्यामध्ये  प्रथम क्रमांक:  कुमारी. जिया बशीर शेख 97 .80  %, द्वितीय क्रमांक: कुमारी ख़ुशी संतोष गवस  95.80 %, तृतीय क्रमांक कुमारी. इनान आलीम  बंगलेकर  90 .40%, कुमारी संजना सुरेशकुमार सुंदेशा  90 .40 % तसेच कुमारी. दानिया बिलाल बंगलेकर  हिने 89 .80 % गुण मिळवून चौथा क्रमांक आणि कुमारी. प्रतीक्षा सुभाष गावडे  हिने 89 .60%   गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला.

तसेच परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या एकुण २३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी विशेष प्राविण्य  आणि ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे अध्यक्षइम्तियाज खानापुरी, उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग व सहसचिव श्री . सुलेमान  बेग , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी प्रशालेत उपस्थित राहून एस् . एस . सी . परिक्षेत  प्रथम क्रमांक  मिळवलेल्या कु . जिया बशीर शेख हिचे व तिच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . तसेच सांवतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी,  प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ ,  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी एस् . एस् . सी परीक्षा उत्तीर्ण सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.