सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी विविध स्पर्धा उत्साहात...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 16, 2023 18:48 PM
views 71  views

सावंतवाडी : मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये दि. १५ ऑगस्ट  २०२३ रोजी  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत  ठिक सकाळी ७.३० वाजता प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ७६ व्या  स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच स्वातंत्र्यदिनानिमीत्त प्रशालेत विविध क्रीडास्पर्धांचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केजी विभाग व इ. १ ते ४ थीतील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ, इ. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरम स्पर्धा व ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी टेबल टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक - शिक्षक संघ कार्यकारिणी समितीतील पदाधिकाऱ्यानी स्वतः खेळात सहभाग घेऊन स्पर्धांचे उद्घाटन केले. सर्व विद्यार्थांनी उत्साहाने खेळत सर्वच खेळांचा आनंद घेतला.

यावेळी संस्था पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी,  पालक, सर्व विद्यार्थी तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा आस्वाद घेत सर्व स्तरावरून प्रशालेचे कौतुक होत आहे.