
वेंगुर्ले : आज दिनांक २ मे २०२५ रोजी वेंगुर्ला भाजपच्या वतीने भाजपा कार्यालय वेंगुर्ला येथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला त्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी भाजपचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपु परब, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडीस, जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, शहर सरचिटणीस रसिका मठकर, अल्पसंख्याक मोर्चाच्या हसीनाबेन मकानदार, मच्छिमार नेते दादा केळूसकर, युवा मोर्चाचे भूषण सारंग, शक्ती केंद्रप्रमुख बाबुराव मेस्त्री, संतोष शेटकर, देवेंद्र डिचोलकर, कमलेश गावडे, बूथ प्रमुख पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णाजी सावंत, सचिन सावंत, महेश प्रभू खानोलकर, अक्षय परब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.