
देवगड : देवगड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना व युवा सेनेच्या वतीने देवगड येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला या रक्तदान शिबिरात सुमारे ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले यात विशेष करून या रक्तदात्यामध्ये एक आई सौ श्रुती करंदीकर व मुलगा वेदांग करंदीकर असे दोन रक्तदाते उपस्थित होते. या रक्तदान शिबिदाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक ,शिवसेना नेते अतुल रावराणे,उद्योगपती नंदकुमार घाटे आप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर महिला आघाडी प्रमुख निलम सावंत पालव युवासेना उपाध्यक्ष नीनाद देशपांडे शिवसेना तालुकाप्रमुख जयेश नर युवा सेना तालुका अध्यक्ष फरीद काझी, महिला आघाडी तालुकाप्रमुख सायली घाडीगावकर, वर्षा पवार ,पूर्वा सावंत ,शाखाप्रमुख रिया शेडगे माधुरी ठूकरूल नम्रता दहिबावकर, श्रुती करंदीकर अफसाना डोंगरकर ,विभाग प्रमुख संदीप डोळकर, रमाकांत राणे ,महेश फाटक, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल दत्ताराम तिरलोटकर ,सुनील तिरलोत्कर, ज्येष्ठ शिवसैनिक दादा पडेलकर ,सुनील जाधव, सुनील तेली,नगरसेवक बुवा तारी,नगरसेवक विशाल मांजरेकर संतोष तारी उपस्थित होते. या निमित्ताने युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगव्या सप्ताहात मशाल चिन्ह घरोघरी पोहोचून पोहोचविण्यासाठी सेल्फी विथ मशाल या उपक्रमाचां शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.रकतदात्याचा प्रशस्तीपत्रक व छत्री भेट देवून सन्मान करण्यात आला.
या रक्तदान शिबिराला रक्तपेढीचे डॉ.निखिल शिंदे,डॉ.संकेत रोटे,अंजली परब,रुबिना शरीत मसलत,नेहा परब,कांचन परब,सुरेश डोंगरे,प्रथमेश घाडी,नितीन गावकर यांनी सहकार्य केले.