बौद्धजन सेवा संघाच्या वतीने तळेबाजारला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 16, 2024 05:35 AM
views 208  views

देवगड :  देवगड तळेबाजार येथे देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने तळेबाजार येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवगड- कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आ. नितेश राणे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना दीप प्रज्वलन करून वंदन केले.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.आणि  संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या फंडातून या संस्थेला ४० लाख रुपयाचे सभागृह बांधून देण्याचे आश्वासन तसेच विहाराच्या सभोवताचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या कार्यक्रम यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य आणि संघाचे उपाध्यक्ष अजित कांबळे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष शामसुंदर जाधव, उपाध्यक्ष अजित कांबळे, खजिनदार प्रभाकर साळसकर, सल्लागार श्रीपत टेंबुलकर, विजय कदम,  अरविंद वंळजू, वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महेश परुळेकर, प्रवक्ते सौ. सुषमा हरकुळकर मॅडम,  एसएससी देवगड भाजपा अनुसूचित जाती मोर्चा देवगड मंडळ अध्यक्ष देवदत्त कदम, जिल्हा सचिव श्री संदीप साटम, देवगड तालुका मंडळ अध्यक्ष राजू शेट्टे उपस्थित आदी उपस्थित होते.