शालेय शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सेलिब्रेशन !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 10, 2024 15:16 PM
views 429  views

सावंतवाडी : विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर करताच राज्यभरातून शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे.

सावंतवाडीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर देखील फटाके फोडून, लाडू वाटून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, गजानन नाटेकर, शर्वरी धारगळकर, दत्ता सावंत, नंदू शिरोडकर, नंदू गावडे, शैलेश तावडे आदी उपस्थित होते.