
सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायत कसाल येथे संतशिरोमणी तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज याची जयंती प्रतिमा पुजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी कसाल ग्रामविकास अधिकारी कोकरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले तर कसाल तेली समाजाच्यावतीने बाळा कांदळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसाल उपसरपंच शंकर परब, डोंबिवली लायन्स क्लबचे माझी अध्यक्ष डोंबिवली जिमखान्याचे खजिनदार, इंटरनॅशनल ह्यूमन राईट ठाणेचे जिल्हाअध्यक्ष, आनंद डिचोलकर ,कसाल ग्रा.सदस्य मिलिंद सावंत,पुजा आंबेरकर,गणपत कसालकर,संजय वाडकर सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष निलेश कामतेकर, जिल्हा सदस्य साईनाथ आंबेरकर,बाळा कांदळकर,बाळा सातार्डेकर ,शरद कांदळकर,दिनेश पेडणेकर,बाळा तेली,रामदास कामतेकर,अमोल कांदळकर,आदेश कांदळकर,भाई पेडणेकर,ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग आणी कसाल तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.