
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन तहसील कार्यालयातील स्टाँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, मतमोजणी सुमारे २० दिवसांनी पुढे गेल्याने या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हींच्या स्टोअरेज कमी पडू नये यासाठी मध्ये वाढ करण्यात आली आहे. यासाठी सर्व ३९ उमेदवारांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत ही स्टोअरेज वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे स्टोअरेज कमी पडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. यापूर्वी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार होती. ती आता २१ रोजी होणार आहे. त्यामुळेही स्टोरेज वाढवण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.










