भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग दुसऱ्या वर्षी 100% निकाल

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2023 19:11 PM
views 238  views

सावंतवाडी : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. यात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत सलग दुसऱ्या वर्षी 100 निकाल देण्यात यश मिळवले आहे. प्रशालेमधून एकूण 35 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 90 टक्क्याहून अधिक गुणांच्या ए-वन श्रेणीत 7 विद्यार्थी, 80 टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए-टू श्रेणीत 13 विद्यार्थी व 70 टक्क्यांहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण अयान शिकलगार 97.50, आर्य प्रभू खानोलकर 95.67, आदित्य जगताप 95.67, वेदांत पांगम 94.50, राहुल राऊत 93.50, आदर्श काणेकर 92.17 व रिया कासरलकर  90.17 यांनी प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापक व्यंकटेश बक्षी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.