
कणकवली : शहरातील ओव्हरब्रिजखाली नरडवे नाक्याजवळ असणाऱ्या बस स्टॉप समोरील देश खाली काही युवकांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11:00 च्या सुमारास घडली. नेमकी ही मारामारी कशामुळे झाली हे समजू शकले नसले तरी गाडी पार्किंग करण्यावरून झाली असल्याचे तेथील स्थानिक नागरिकांकडून बोलले जात होते.यामध्ये एकाला मारहाण झाली असल्याचे समजते. याची माहिती मिळताच कणकवली पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना बघून काहींनी पलायन केले केले तर काही पोलिसांच्या तावडीत सापडले. यामध्ये स्वप्निल सुभाष पाटील कणकवली परबवाडी, चंदन विकास पाटील तरंदळे, राजेंद्र मधुकर कोकम कासरल, निलेश मोहन कदम वरवडे, राजेश शांताराम परब टेम्बवाडी कणकवली,सुदर्शन सदानंद पालव वागदे,संकेत बांदेकर कणकवली, मंगेश सावंत तळवडे, यांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
ओव्हरब्रिजखाली वाहन पार्किंग करण्यावरून त्यांच्या हाणामारी झाल्याचे काहींकडून सांगण्यात आले. असे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी याला आळा बसणे गरजेचे आहे.