कॅथॉलिक अर्बन २०० कोटी ठेवींचा टप्पा पार करेल : पी. एफ. डॉन्टस

सर्वसाधारण सभेत देव्या सुर्याजींचा विशेष सन्मान
Edited by: विनायक गावस
Published on: August 20, 2023 20:58 PM
views 123  views

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने ३१ मार्च २०२३ अखेर १८६ कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून लवकरच २०० कोटी ठेवींचा टप्पा पार करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष पी.एफ डॉन्टस यांनी व्यक्त केला. तर सातत्यपुर्ण कर्ज वसुली,२ कोटी १० लाख निव्वळ नफा, ४०% च्या घरात असलेली संस्थेची गुंतवणूक, १३१ कोटी कर्ज तसेच संस्थेला आदर्श ठरावी व अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाण संस्थेने राखली असल्याचे ते म्हणाले. 

कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मिलाग्रीस चर्च सावंतवाडीचे पॅरीश प्रिस्ट फा. मिलेट डिसोजा उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला फा. मिलेट डिसोजा यांनी प्रार्थना केली. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

त्यानंतर युवा रक्तदाता म्हणून ज्यांची ओळख आहेत ते सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांच्या समाजसेवेची दखल घेऊन संस्थेच्या सर्व सभासदांच्यावतीने अध्यक्ष व फा. मिलेट डिसोजा यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, रोख रक्कम व मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर सत्कारमुर्ती देव्या सुर्याजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

संस्थेने आजपर्यंत २९ वर्षाची व्यवसायाची कटिबद्धता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग "अ" ची परंपरा कायम राखली आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता संस्थेवरील सभासद ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाल्यामुळे आज मोठया स्वरूपाच्या ठेवी संस्थेकडे जमा होत आहेत. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेने १८६ कोटी ठेवीचा टप्पा पार केला असून लवकरच २०० कोटी ठेवीचा टप्पा पार करेल. सातत्यपुर्ण कर्ज वसुली,२ कोटी १० लाख निव्वळ नफा, ४०% च्या घरात असलेली संस्थेची गुंतवणूक, १३१ कोटी कर्ज तसेच संस्थेला आदर्श ठरावी व अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाण संस्थेने राखली आहेत. आज संस्थेने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या नेट बँकिगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत व सहकार क्षेत्रात आपला वेगळा टसा उमटवला असल्याचे मा. अध्यक्ष पि.एफ डॉन्टस यांनी सांगितले. चालूवर्षी देखील सभासदांना १४ टक्के लाभांश मंजुर करण्यात आला व लगेचच सभा चालू असताना नेट बँकींगच्या सहाय्याने लाभांश सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात आला, त्यामुळे सभासदांकडून आनंद व्यक्त करण्यात आला व संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर फा. मिलेट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेचे सर्व विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. इतिवृत वाचन एवरीस्ट मेंडीस तर अहवाल वाचन सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जीस यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे व्हाईस चेअरम  रुजाय रॉड्रीक्स यांनी केले. सभेचे सुत्रसंचालन फ्रॅकी डॉन्टस यांनी केले.