कॅथॉलिक बँकेच्या नव्या शाखेचं उद्घाटन

युवराज लखमराजे - महेश सारंगांनी दिल्या शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: June 18, 2025 15:20 PM
views 316  views

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सावंतवाडी येथील नवीन शाखेचे भव्य उद्घाटन आज रत्नेश प्लाझा, सालईवाडा येथे संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी रेक्टर मिलाग्रीस कॅथेड्रल रेव्ह. फा. मिलेट डिसोजा, श्रीमती अॅमी डॉक्टर, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनाच्या निमित्ताने सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग  यांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत संस्थेच्या नवीन शाखेस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवेकर, अँड. अनिल निरवडेकर, अँड. संजू शिरोडकर आदी भाजप पदाधिकारीही उपस्थित होते. संस्थेच्या चेअरमन आनामारी डिसोजा, व्हा. चेअरमन पीटर डिसोजा, सेक्रेटरी मार्टिन आल्मेडा तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने उद्घाटन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. सोहळ्याला मोठ्या संख्येने सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी हजेरी लावली होती.