सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशनच्या शववाहनाचे लोकार्पण

Edited by: विनायक गांवस
Published on: October 09, 2024 09:49 AM
views 254  views

सावंतवाडी : सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशन सावंतवाडीच्या शववाहनाचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवित आहात. स्थानिक आमदार म्हणून माझे सर्वोतोपरी सहकार्य आपणस राहील असे प्रतिपादन मंत्री केसरकर यांनी केले. नवसरणी येथील लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 

 मंत्री दीपक केसरकर यांच्या सौजन्याने ही शववाहीनी देण्यात आली आहे. यासाठी ख्रिस्ती बांधवांनी केसरकर यांचे आभार मानले. बुधवारी दीपक केसरकर यांच्या हस्ते या शववाहिनीचा लोकार्पण सोहळा नवसरणी येथे संपन्न झाला. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशनच्या शववाहन लोकार्पण सोहळ्यास उपस्थित रहाता आले. मी सदैव आपल्या सोबत आहे. सावंतवाडीत आपण सर्वजण बंधुभावान जपत गुण्यागोविंदाने नांदतो. अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवित आहात त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. ख्रिस्ती बांधवांचे जुने चर्च देखील नव्याने उभारण्यात येत असून स्थानिक आमदार म्हणून सर्वोतोपरी सहकार्य आपणस राहील अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली.

याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कॅथॉलिक असोसिएशनचे चेअरमन जॉय डान्टस, व्हा. चेअरमन अगस्तीन फर्नांडिस, सेक्रेटरी जॉनी फेराव, फादर मिलेट डिसोझा, कॅथॉलिक बँक चेअरमन अनामेरी डिसोझा, सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा, सैनिक पतसंस्थेचे श्री. ओटवणेकर, सुनील राऊळ, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, जेम्स बोर्जीस, जोसेफ आल्मेडा आदींसह कॅथॉलिकचे पदाधिकारी उपस्थित होते.