सावंतवाडीत रविवारी कॅरम सेमिनार !

Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 14:04 PM
views 126  views

सावंतवाडी : रविवार 10 डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे मोफत कॅरम कोचिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत कॅरम कोचिंग देण्यात येणार आहे.

सेमिनारचे आयोजन जगन्नाथराव भोंसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत करण्यात आले आहे. सेमिनार सकाळी 09.30 ते दुपारी 01.30 या वेळेत घेण्यात येईल. नाव नोंदणी व अधिक माहीतीसाठी विद्यार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.