वीज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचे कार्ड !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2024 14:06 PM
views 85  views

सावंतवाडी : जिल्ह्यातील वीज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचे कार्ड, ओळखपत्र, व पेमेंट स्लिपचे वाटप कामगार नेते अशोक सावंत यांच्या उपस्थितीत कामगार संघाचे सिंधुदुर्ग अध्यक्ष संदीप बांदेकर व मच्छिमार नेते छोटू सावजी यांच्या  हस्ते बांदा शाखा कार्यालयात कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली.

जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या हितासाठी महावितरण कंपनीच्या कुडाळ व कणकवली या दोन्ही विभागीय कार्यालय मध्ये 20 व 21 नोव्हेंबर रोजी कामगार नेते अशोक सावंत व माजी सभापती जयेंद्र रावराणे, वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर याच्या प्रमुख उपस्थित महावितरण व ठेकेदार यांची बैठक कामगारांच्या उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आली होती. तांत्रिक काम करत असताना वाढते अपघात रोखण्यासाठी व त्यांना काम करताना येणाऱ्या समस्या यावर चर्चा करून कामगारांना त्यांना सर्व सोयसुविधा मिळाव्यात यावर चर्चा करण्यात आली.

वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग व आपल्या सर्व कंत्राटी कामगारांच्या प्रयत्नामुळे व एकजुटीमुळे तसेच, कामगार नेते अशोक सावंत, माजी सभापती वैभववाडी जयेंद्र रावराणे, संदीप साटम (देवगड) शेखर गावकर (वेंगुर्ला),जावेद खतीब (बांदा) तसेच आपले मुख्य संघटक सर्वेश राऊळ यांच्या पाठिंब्यामुळे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे कुडाळ विभागीय कार्यालय मधील सर्व कंत्राटी कामगारांची राज्य कामगार विमा योजनाचे कार्ड, कामगारांना ओळखपत्र, व पेमेंट स्लिप वाटप कामगार नेते अशोक सावंत, सिंधुदुर्ग कामगार संघाचे संदीप बांदेकर व मच्छिमार नेते छोटु सावजी याच्या हस्ते बांदा शाखा कार्यालयात वितरित करण्यात आली. यावेळी संदीप साटम देवगड, भाई नरे देवगड शेखर गावकर बांदा, अध्यक्ष संदीप बांदेकर, उपाध्यक्ष रुपेश पवार, संघटक मोहन गावडे, खजिनदार बापू देसाई, व विशाल चेंदवणकर, बाबाजी गावडे , बबलू शिरोडकर, चेतन सावंत, रघुनाथ जाधव, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, ओरोस तालुक्यातील प्रतिनिधी व सहकारी कामगार आबा कापडोस्कर, प्रथमेश नाईक, आबा चव्हाण, अजित पाटयेकर, मंदार गोसावी, सिद्धेश वराडकर, रितेश पालकर, पुष्पसेन परब, संदेश शिरोडकर, भीसाजी परब, रामा झोरे, सचिन नाईक, गुरुनाथ कुडव आदी उपस्थित होते.