
वैभववाडी : उन्हात उभ्या करुन ठेवलेल्या कारची मागील काच अचानक फुटून स्फोट झाला.हा प्रकार आज दुपारी १च्या सुमारास वैभववाडी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात घडला.या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका कार चालकाने कार उभी केली होती.काही वेळात या कारची मागील काच अचानक फुटली.त्याचा मोठा आवाज झाला.अचानक झालेल्या या आवाजामुळे सर्व जण चौकाच्या दिशेने धावले.यावेळी कारची मागील काच फुटून चक्काचूर झाला होता.ही काच अती उष्णतेमुळे फुटली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.ही घटना समजात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.