नांदगाव येथे चार चाकीची दुचाकीला धडक

सुदैवाने जिवितहानी टळली ; अपघातात चारजण जखमी
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 23, 2023 13:19 PM
views 92  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर तालुक्यातील नांदगाव - असलदे तावडे वाडी येथे पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरून निघालेल्या मामा-भाचे व पुतण्या यांना भरधाव कारची धडक बसली. (एमएच ०७ बीयु २१७३) ही गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना नांदगाव असलदे तावडेवाडी पेट्रोल पंप येथे आली असता पेट्रोल भरून हायवेवर आलेल्या (एमएच ०७ झेड १९०५) या दुचाकीला चारचाकी क्रमांक (एमएच ०७ बीयु २१७३) ची जोरदार धडक बसली. हा अपघात आज सायंकाळी ७ च्या सुमारास घडला आहे. यात अनिश नारायण इस्वलकर (४० वर्षे, तोंडवली), यश राजकुमार आडिवरेकर (भाचा, १२ वर्षे), साई नितीन इस्वलकर (५ वर्ष), आदित्य नितीन इस्वलकर (३ वर्षे) हे गंभिर जखमी झाले. जखमींना नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी अनिश नारायण इस्वलकर यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तर त्या तीन मुलांना कणकवलीतील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती मिळाली. यावेळी अपघातग्रास्तांना रूग्णवाहिका चालक अमोल तेली, सी.आर.चव्हाण यांनी मदतकार्य केले. एकंदरीत जर पाहिले तर ठिकठिकाणी झालेले पेट्रोलपंप व अनधिकृतरित्या ठेवलेले तेथील मिडलकट हे वाहनचालकांना जीवघेणे ठरत आहेत. नांदगाव येथे अनधिकृत मिडलकटमुळे झालेला हा सहावा अपघात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे आतातरी महामार्गप्राधिकरण असे अनधिकृत असलेले मिडलकट बंद करणार की वाहनचालकांना जीवघेणेच ठेवणार असा संतप्त सवाल देखिल तेथे उपस्थित केला जात होता.