टायर फुटून कारचा अपघात

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 30, 2025 19:39 PM
views 98  views

कणकवली : कुडाळ ते लांजा असा प्रवास करत असताना पुढील डाव्या बाजूचा टायर फुटून कारवरील नियंत्रण सुटले व परिणामी कार पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. 

महामार्गावरील कासार्डे ब्रिजवर शनिवारी सकाळी १०.४५ वा. सुमारास झालेल्या या अपघातात कारचालक दत्तात्रय विलास ठाकूर (३८, कुडाळ - माठेमाड) यांना काहीशी  दुखापत झाली. तसेच कारचेही बरेच नुकसान झाले. याबाबत ठाकूर यांच्या खबरीनुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे