
वैभववाडी : येथील शहरातील अंकित मेडिकल येथे झालेल्या चोरीत चोरट्याच चित्रिकरण सीसीटीव्हीत झाल आहे. त्याच फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. त्या चित्रीकरणात दुकानात चोरटा एकटाच असल्याचे दिसत आहे. त्याचे फोटो सोशल मिडियावर पाठवले आहेत अशी व्यक्ती आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याच आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.