
देवगड : जल जीवन मिशन अंतर्गत ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य यांचे ग्रामपंचायत स्तरावरील दोन दिवशीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर कुणकेश्वर भक्त निवास सभागृहात संपन्न झाले.या कार्यक्रमात प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थाना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब म्हणाले की पाणी व स्वच्छता सुविधांच्या केवळ सुविधा निर्माण करणे हे पुरेसे नसुन निर्माण झालेल्या व होणाऱ्या सुविधांचा शाश्वत वापर करण्यासाठी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व गावातील क्षेत्रिय कर्मचारी यांची या अनुषंगाने क्षमता बांधणी करणे महत्वाचे आहे.यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांचे प्रशिक्षण महत्वाचे आहे.
यावेळी क्षमता बांधणी व समुदाय विकास तज्ञ रूपाजी किनळेकर यांनी पाणी पुरवठा योजनेचे संचालन,देखभाल व दुरुस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.तसेच मनुष्यबळ विकास समन्वयक श्रीम.इंदीरा परब यांनी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण व स्त्रोतांच्या प्रभावी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.तर समाजशास्त्र तज्ञ भगवान चव्हाण यांनी जल जीवन मिशन व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची भुमिका याबाबत मार्गदर्शन केले.तर पाणी गुणवत्ता तज्ञ श्रीम.हर्षदा बोथीकर यांनी पाणी गुणवत्ता व्यवस्थापन व सर्वेक्षण आणि सुरक्षित पाणी पुरवठा याबाबत मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुणकेश्वर ग्रामपंचायत उपसरपंच शशिकांत लब्दे, मा .सरपंच चंदकांत घाडी , देवस्थान ट्रस्टचे सदस्य . संजय आचरेकर उपस्थित होते . तर समारोप प्रसंगी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष. संतोष लब्दे ,कुणकेश्वर ग्रामपंचायत उपसरपंच शशिकांत लब्दे, मा.सरपंच .चंदकांत घाडी , देवस्थान ट्रस्टचे सदस्य .संजय आचरेकर, कुणकेश्वर ग्रामसेवक गुणवंत पाटील , ग्रामसेवक घरजाळे, ग्रामसेविका संगिता राणे , गटसमन्वयक श्रीम . वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ श्रीम . हर्षदा बोथीकर,मंगेश मेस्त्री,अमित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते .या प्रशिक्षणाला देवगड तालुक्यातील १७ गांवातील ग्राम पाणी पुरवठा सदस्य , आशा , अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी सहभाग होते . या प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन विनायक धुरी तर आभार समाजशास्त्र तज्ञ भगवान चव्हाण यांनी केले .