महायुतीकडून तेरवण मेढेमध्ये प्रचारात आघाडी

Edited by:
Published on: November 08, 2024 19:59 PM
views 166  views

दोडामार्ग : महायुतीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाल्या नंतर दोडामार्ग शिवसेना, भाजप, आरपीया, राष्ट्रवादी चे पदाधिकारी गावनिहाय प्रचार यंत्रणा राबवत आहेत. आज तेरवण मेढे येथे प्रचार सभा घेण्यात आली या सभेला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तालुक्यातील कोणाळ पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदार संघात विधान सभा निवडणुकीच्या  पाश्वभूमीवर दोडामार्ग महायुतीचे पदाधिकारी कार्यरते मोठ्या जोमाने काम करत विरोधकांना थारा देणार नाही असे बोलत प्रचार सभा  घेतल्या जात आहेत या प्रचार सभांना जनतेमंधून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे आज कोणाळ मतदार संघात तेरवण मेढे येथे सभा घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष राजन म्हापसेकर,  राजेद्र निंबाळकर, प्रवीण गवस, शैलेश दळवी, गोपाळ गवस, मायकल लोबो, संजय गवस, विनायक शेट्ये आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.