'आयुष्यमान भव' ! ; उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोहिमेचा शुभारंभ

सरपंच वैभवी दळवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 13, 2023 19:33 PM
views 134  views

वैभववाडी : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहीमेचा आज उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ झाला.गावच्या सरपंच वैभवी दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

    देशात केंद्र शासनाच्यावतीने आयुष्यमान भव ही मोहीम राबविण्यात येणार आहे.संपुर्ण देशात 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम व 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.या मोहीमेला उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपासून प्रारंभ झाला.या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम राबविले जाणार आहेत.याचा शुभारंभ श्रीमती दळवी यांनी केला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ करण पाटील, आरोग्य सहाय्यक राम गवस, आरोग्य सेविका मानसी कांबळे,रुपाली पावसकर,मयुरी तांबे,श्रेया साळुंखे आदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

  डॉ.पाटील यांनी या मोहीमेअंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती दिली.तसेच  उपस्थित लाभार्थ्यांना अ.भा कार्ड,इ कार्ड यांचं वाटप करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित सर्वांनी अवयव दानाची शपथ घेतली