
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत ट्रक व दुचाकीच्यामधून धूम स्टाईलने दुचाकी चालविणाऱ्या दुचाकिस्वाराचा अपघाता झाला. यात तो किरकोळ जखमी झाला. मात्र त्याचा धूम स्टाईल बाईकचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दोडामार्ग गोवा मार्गावर विशाल मणेरीकर यांच्या घरासमोर ट्राफिक झाल्याने एक ट्रक थांबला. त्याच्या विरुद्ध बाजूला दुचाकी उभी होती आणि याच मार्गावर गोव्याहून दोडामार्गच्या दिशेने दुचाकी स्वार स्पीडमध्ये येऊन उभ्या असलेल्या ट्रकला आदळला. रस्त्यावर फरफटत गेला. यात तो थोडक्यात वाचलाय. किरकोळ दुखापतही झालीय.