ज्ञानदीप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Edited by: विनायक गावस
Published on: January 08, 2024 13:53 PM
views 96  views

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी जिल्हास्तरावर उपक्रमशील व्यक्तींना विविध क्षेत्रांत समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल मानाचा समजला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी यावर्षी मंडळाकडून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मंडळाच्या या उपक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, संगीत, पत्रकारिता, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी २५ जानेवारीपर्यंत स्वतः च्या कार्याचा माहितीचा प्रस्ताव चार फोटोंसह अध्यक्ष जावेद शेख  

एफ् ४९,सालईवाडा, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग, या पत्यावर पाठवून सहकार्य करावे असे आवाहन वाय. पी. नाईक, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, विनायक गावस, निलेश पारकर (कणकवली), सौ.प्रज्ञा मातोंडकर, प्रा.नागेश कदम (मालवण),भरत गावडे (सावंतवाडी) विठ्ठल कदम, श्रद्धा सावंत यांनी केले आहे.

हे पुरस्कार एस.आर.मांगले,आर व्ही.नारकर,व्हि.टी.देवण,सौ.रश्मी भाईडकर, यांनी पुरस्कृत केले आहेत.पुरस्काराचे हे सलग अठरा वर्षे असून अधिक माहितीसाठी वाय.पी.नाईक (९४२०२०४१०५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.