
सावंतवाडी : सोनुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत माऊली गाव विकास पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी प्रचाराच्या झंझावातात उडी घेतली आहे. माजी नगरसेवक आनंद नेवगी व कार्यकर्त्यासह प्रचारात उडी घेत गावात सुरू असलेल्या भाजप पुरस्कृत माऊली गाव विकास पॅनलच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.यात ग्रामस्थांची मोठी साथ मिळत असून यावर्षी परिवर्तन अटळ आहे. भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित आहे असा विश्वास बंटी पुरोहित यांनी व्यक्त केला.