बुधवळे सरपंच संतोष पानवलकर शिवसेनेतच

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची घेतली भेट
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 23, 2023 19:11 PM
views 117  views

मालवण :  बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी कालच भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, काही तासातच बुधवळे सरपंच पानवलकर यांनी यु टर्न घेत आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण कायम आ. वैभव नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले.  मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे याची मला पूर्णतः जाण आहे. त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असेही त्यांनी सांगितले. 


यावेळी खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांनी  संतोष पानवलकर  यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रा.प.सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते.