
सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे येथे बीएसएनएलचा नवीन टॉवर गेल्या वर्षी उभारण्यात आला. परंतु, गेले अनेक महिने वारंवार नेटवर्क सेवा विस्कळीत होत आहे. निगुडेसह अन्य पंचक्रोशीतील गावे या टाॅवरवर अवलंबून आहेत. मात्र, अधिकारी याकडे कानडोळा करत आहे. यासंदर्भात बीएसएनएलनचे उपमहाप्रबंधक रवीकुमार जिन्नू यांची भेट घेत निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी निवेदन सादर केले.
त्या निवेदनात म्हटलं आहे की, नेटवर्कमध्ये मोठा प्रॉब्लेम होत आहे. फोर जी सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. यासंदर्भात आपले टेक्निशन विभागाचे प्रमुख श्री. माथुर तसेच श्री .फुटाणे यांच्याशी वारंवार आम्ही फोन द्वारे तक्रार केली असता आम्ही आज बघितलं उद्या बघणार अशी थातूरमातूर उत्तर देण्यात येत होती. यासंदर्भात आज उपमहाप्रबंधक श्री.जन्नु यांनी सांगितले.
यासंदर्भात लवकरात लवकर एक टीम पाठवून या टाॅवर संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच टाॅवर उभारताना त्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने दाखवलेले जमीन ही खासगी असल्यामुळे या संदर्भातही चर्चा विनिमय करण्यात आले. आठ दिवसात पत्र मिळाल्यापासून योग्य ती कार्यवाही न झाल्यास आपल्या बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकू चा इशारा श्री. गवंडे यांनी दिला आहे.