कलंबिस्तला BSNL टॉवर मंजूर

सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते कामाचं भूमिपूजन
Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 15:47 PM
views 458  views

सावंतवाडी : गेली कित्येक वर्ष कलंबिस्त गावात बीएसएनएल चा मोबाईल टॉवर व्हावा अशी इच्छा होती. पण अखेर हा टॉवर मंजूर झाला असून या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन गावचे सरपंच सपना संदीप सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कलंबिस्त राईवाडा येथे करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ सावंत म्हणाल्या, कलंबिस्त गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा टॉवर निश्चितच वरदान ठरणार आहे. आम्ही गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांना एकत्र घेऊन काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नाने हा टॉवर मंजूर झाला आहे. एक प्रकारे गाववासियांचे स्वप्न आज सत्यात उतरले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. घरटी सैनिकी परंपरा असलेला कलंबिस्त गाव या गावात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न होत होते. पण अखेर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कलंबिस्त गावात बीएसएनएल टॉवर मंजूर झाला. यासाठी लागणारी जागा राईवाडा येथील अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जवळील जिल्हा परिषद च्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेत हा टॉवर उभारण्याच्या कामाला आज शनिवार 18 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आला आहे. टॉवर कामाचे भूमिपूजन सरपंच सौ सपना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरेश पास्ते हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुंडू सावंत जेष्ठ देवकार रमेश सावंत माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत शिवसेनेचे शाखाप्रमुख दिनेश सावंत श्याम राऊळ माजी सरपंच अनंत सावंत मधुकर राऊळ बाळा राजगे बाबू सावंत ज्येष्ठ ग्रामस्थ सगुण पास्ते रामचंद्र पास्ते तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बाबा पास्ते माजी सैनिक प्रकाश सावंत बाळा सावंत ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव शेखर मेस्त्री शशिकांत सावंत दत्ताराम कदम जितेंद्र पांगम राजेश सावंत मेघा तावडे सौ सुप्रिया राऊळ ठेकेदार लक्ष सुध रामा सावंत दाजी सावंत चंदू पास्ते उदय सावंत वसंत सावंत सौ सावंत अंगणवाडी सेविका सौ बिडये आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच सौ सावंत म्हणाल्या, गेली वीस वर्षाहून अधिक काळ या गावात दूरसंचार ची रेंज मिळत नाही त्यामुळे अनेक गैरसोयना सामरे जावे लागत आहे. जेव्हा आम्ही या गावाचा कारभार हाती घेतला तेव्हा लोक आम्हाला या गावात विकासात्मक दृष्ट्या पहिलं पाऊल टाका ते म्हणजे मोबाईल टॉवर. आमच्या प्रयत्नातून आणि गावातील सर्व जनतेच्या सहकार्यातून खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मोबाईल टॉवर मंजूर झाला. आज या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे खरंच स्वप्न आमचे सत्यात उतरले आहे. आता येत्या 45 दिवसात टॉवरचे काम पूर्ण होईल आणि लवकरच स्वतःच्या गावातील टॉवर वरून घराघरात रिंगटोन वाजेल गावाचा विकास निश्चितच केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्री गुंडू सावंत म्हणाले, डिजिटल जमान्यात गावागावात मोबाईल टॉवर असणे गरजेचे आहे. अथक प्रयत्नानंतर गावात मोबाईल टॉवर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. निश्चितच या टॉवरमुळे गावाच्या विकासाला गती येणार आहे सर्वांनी राजकीय हवे दवे बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीने एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन उपस्थित त्यांचे आभार ॲड संतोष सावंत यांनी मानले.