LIVE UPDATES

तळवडेत BSNL सेवा सुरळीत

कोकणसादच्या वृत्ताची दखल
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 12, 2025 12:12 PM
views 91  views

देवगड : देवगड तळवडे येथील BSNL सेवा कोलमडली होती. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. या गावातील शेतकरी वर्ग तसेच इतर ग्रामस्थ यांना या गावात BSNL व्यतिरिक्त जनसंपर्कासाठी दुसरी कोणतच साधन नसल्याने परगावी असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधता येत नव्हता. यायाबत  कोकणसाद लाईव्हने वृत्त  प्रसारित  केल्यानंतर याची दखल घेत ही सेवा पूर्ववत सुरू केली आहे.

येथील काही जागरूक ग्रामस्थ यांनी तहसीलदार रमेश पवार, BSNL या दूरसंचार विभागाकडे लेखी निवेदन दिले होते. याची तात्काळ दखल तहसीलदार रमेश पवार यांनी घेऊन संबंधित विभागाशी संपर्क केला व यंत्रणा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते.