मळगाव पंचक्रोशीत BSNL चे नेटवर्क सुरळीत

मनसेच्या मागणीला यश
Edited by: विनायक गांवस
Published on: June 27, 2024 14:19 PM
views 30  views

सावंतवाडी : मळगाव पंचक्रोशीत विद्युत ट्रासफार्मरच्या बिघाडामुळे बिएसएनएलच्यां नेटवर्कमध्ये महीना भर व्यत्यय येत असल्याने ग्राहक हैराण झाले होते त्यामुळे वीज कंपनीने सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी वीज वितरणचें उपअभियंता कुमार चव्हाण यांच्याकडे केला होता. त्यानंतर दोन दिवसात ट्रासफार्मर बदलुन दिल्याने बिएसएनएलचें नेटवर्क सुरळीत झाल्याने ग्राहकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मळगाव पंचक्रोशीतील BSNL नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले होते. अर्धा अर्धा महीना मोबाईलला नेटवर्कच नसल्याने ग्राहकानी पैसे भरून घेतलेल्या सुविधा वाया जातं होत्या. ग्राहकांचा बिएसएनएलवर जास्त विश्वास असल्याने शिवाय जास्तीत जास्त लोकांकडे सिमकार्ड असल्याने सेवेत सुधारणा करण्याची मागणी होत होती. सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत,  विभागअध्यक्ष राकेश परब इ. पदाधिकाऱ्यांनी बीएसंएनएलचें अधिकारी आणि ट्रासफार्मर बदलण्याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी  तातडीने दखल घेत एका भेटीतच दोन दिवसात ट्रासफार्मर बदलुन देण्यात आला परिणामी नेटवर्क मंध्ये देखील सुधारणा झाली त्यामुळे ग्राहका मधून समाधान व्यक्त होत आहे.