वीज बील थकीत ; BSNLचं कनेक्शन कापले

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 24, 2024 19:01 PM
views 176  views

वैभववाडी : वीज बिल थकीत राहील्याने तालुक्यातील सांगुळवाडी बीएसएनएलच्या मनो-याचा वीज पुरवठा महावितरणने बंद केली. मनो-याची वीज जोडणी कापण्यात आली आहे. यामुळे या पंचक्रोशीतील बीएसएनएलची सेवा सकाळपासून ठप्प झाली आहे.

सांगुळवाडी येथे बीएसएनएल कंपनीचा मनोरा आहे. या मनो-यावरून सांगुळवाडी, नावळे, सडुरे, अरुळे, निमरुळे, शिराळे या गावात नेटवर्क सुविधा पुरविण्यात येते. या मनो-यासाठी विज वितरण कंपनीचा वीजपुरवठा पुरविला आहे. मात्र संबंधित कंपनीने वीज वितरणचे २७हजारांचे वीज बील भरणा केले नव्हते. याबाबत बीएसएनएलच्या कार्यालयाशी वाअरमन यांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क झाला नाही. अखेर आज वरिष्ठांच्या आदेशानुसार वायरमन याने या मनो-याचा वीज पुरवठा खंडित केला. वीज पुरवठा खंडित झाल्याने या मनो-याची नेटवर्क (रेंज) सुविधा ठप्प झाली. त्याचा परिणाम पंचक्रोशीतील ग्राहकांच्या मोबाईल नेटवर्क झाला. या भागातील सर्व नेटवर्क ठप्प झाले. याचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागला.

याबाबत बीएसएनएलचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही. तसेच वायरमन सुहास गुरव यांच्याशी संपर्क साधला असता ते असे म्हणाले की, संबंधित कंपनीने वीज बिल भरणा केले नव्हते. त्यामुळे वरिष्ठांच्या सुचनेनुसार वीज जोडणी कापण्यात आली. त्या कंपनीने वीज बिल भरले असल्याचे सायंकाळी सांगितले आहे. त्याची खात्री करून बुधवारी सकाळी येथील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.