
बेळगाव : येथील बीएससी टेक्सटाईल मॉलने एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता ग्राहकांच्या फायद्यासाठी नवीन योजना आणली आहे. कमी किंमतीची हमी योजना म्हणून सादर केलेल्या या योजने द्वारे ग्राहकाला कमीत कमी किमतीत वस्त्रप्रावरणे मिळतील. प्रसारमाध्यमांना माहिती देताना मॉलचे संचालक बीयू चंद्रशेखर म्हणाले की, शोरूममधून खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांच्या फायद्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
BSC Textiles हा उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र प्रदेशातील सर्वात मोठा कापड मॉल आहे आणि तो शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे पहिल्या रेल्वे गेट जवळ वसला आहे. 5 मजल्यांवर एक लाख चौरस फुटांवर पसरलेला, मॉल क्षेत्रातील ग्राहकांसाठी सोयीस्कर झाला आहे. कारण पुरुष आणि महिलांसाठी पारंपारिक ब्रँड्ससह जवळजवळ सर्व ब्रँडचे कपडे एकाच छताखाली व मार्केट पेक्षा अत्यंत कमी दरांत येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कोकण व गोव्यातून जाणाऱ्या ग्राहकांसाठी मॉल मध्ये पार्किंगची पुरेशी सोय आहे.
“या मॉलमध्ये कपडे, साड्या आणि इतर फॅब्रिक्स आणि घरगुती फर्निशिंग्ज ची किंमत 130 रू. पासून ते 1 लाख रुपये व त्याहून अधिक आहे. शोरूम सर्व ब्रँड्सवर 10% सवलत व ऑफर प्रमाणे त्याहूनही अधिक सवलत देते हे देखील महत्त्वाचे आहे,” चंद्रशेखर म्हणाले की किंमत हमी योजना सर्वात कमी किमतींबद्दल खात्री देईल.
बीएससी टेक्सटाइल केवळ कर्नाटकातच लोकप्रिय नाही, तर गेल्या वर्षी शोरूम सुरू झाल्यापासून गोवा आणि सिंधुदुर्गमधून ग्राहकांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. दिवाळीचा हंगाम आल्यानंतर आम्ही आता ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये ग्राहक बेळगाव आणि इतर कोणत्याही दुकानातील कपड्यांच्या किमतींची तुलना करू शकतात. जर त्यांना किंमत कमी आढळली तर आम्ही फरक किंमतीच्या दुप्पट रक्कम देऊ,” असंही चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलंय. यावेळी शोरूमचे जनरल मॅनेजर अमजद, मार्केटिंग मॅनेजर इराण्णा, मॉलचे संचालक बी. सी. वेद पत्रकार परिषदेला उपस्थित होते.