येणाऱ्या लोकसभेचे भैय्या किरण सामंत हेच आमचे उमेदवार- शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे संजय आग्रे

उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, उद्योजक किरण सामंत 27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर...
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 23, 2023 19:25 PM
views 151  views

कणकवली : उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, उद्योजक किरण सामंत  27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून पक्ष संघटना वाढीसाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, जिल्हा खजिनदार भास्कर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहरप्रमुख बाळू पारकर उपस्थित होते. 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे. दुपारी साडे बारा ते दीड च्या दरम्यान कुडाळ  एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघा चा आढावा घेण्यात येणार आहे.दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान  ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांसह विकासकामे आढावा, सायंकाळी 5 वाजता कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 6 वाजता शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा स्तरीय आणि राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे पारितोषिक वितरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली.