इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी वृंदा गवंडळकर यांची एकमताने निवड..!

Edited by: दिपेश परब
Published on: July 02, 2023 11:42 AM
views 76  views

वेंगुर्ले : इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या नुतन वर्षासाठी कार्यकारीणी निवडीच्या सभेत  वृंदा गवंडळकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

 इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या सन २०२३–२४ या वर्षासाठी नुतन कार्यकारीणी निवडीची सभा मावळत्या अध्यक्षा व जेष्ठ सदस्या स्मिता दामले यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेत इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ. वृंदा गवंडळकर, सचिवपदी श्रीया परब, खजिनदारपदी ज्योती देसाई, आय.एस.ओ.पदी डॉ. पुजा , तर एडीटरपदी आकांक्षा परब यांची एकमताने निवड कण्यात आली आहे. इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या नुतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा रविवार दि. 16 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 7 यावेळेत शपथ प्रदानाधिकारी साईल प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले सुंदरभाटले येथील साई डिलक्स हॉलमध्ये होणार आहे. या शपथ ग्रहण सोहळ्यास इनरव्हील क्लबच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मावळत्या अध्यक्षा सौ. स्मिता दामले यांनी केले आहे.