तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Edited by:
Published on: July 22, 2024 06:59 AM
views 214  views

सावंतवाडी : तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले. या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.