जामसंडे येथील ब्रिज टूर्नामेंटमध्ये महालक्ष्मी कोल्हापूर संघ विजेता

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 27, 2023 19:37 PM
views 186  views

देवगड : देवगड इंडियन ऑईल पुरस्कृत विद्या विकास जामसंडे व देवगड ब्रिज असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रभा कुंदर ब्रिज टुर्नामेंन्ट जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे नुकतीच पार पडली.

ही स्पर्धा टीम व पेयर्स अशा दोन भागात खेळविण्यात आली.या स्पर्धेसाठी राज्यातुन एकूण १२ टीम सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर इंडियन ऑईलचे जनरल मॅनेजर श्री.अय्यर व इतर पदाधिकारी, माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, जामसंडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय गोगटे, स्पर्धेचे नॅशनल पंच डिओन हे उपस्थित होते.या स्पर्धेत प्रथम विजेता संघ महालक्ष्मी कोल्हापूर, उपविजेता रत्नागिरी, तृतीय क्रमांक इंडियन ऑईल, चतुर्थ क्रमांक भरत मुंबई

पेअर्स प्रथम क्रमांक पूराणीक तिवारी(रत्नागिरी), द्वितीय श्रीकांत ताम्हाणकर, महेश शेट्ये(राजापूर), तृतीय बाळू आणि qचतामणी दामले(रत्नागिरी), चतुर्थ पाटणकर(पूणे)व जोशी(खेड) तर बेस्ट टीम देवगड सुरेश गोगटे, अ‍ॅड.अजित गोगटे व मकरंद भिडे व उदय प्रभूदेसाई, तर बेस्ट पेअर्स देवगड तालुका सुरेश गोगटे व अ‍ॅड.अजित गोगटे व द्वितीय क्रमांक श्रीकांत बोंडाळे आणि बाळा धुपकर या स्पर्धेचे पंच म्हणून डिऑन यांनी काम पाहिले.