
सावंतवाडी : माजी गृह राज्यमंत्र्यांच्या होमग्राउंडवर सत्ताधारी गटातील एका विद्यमान नगरसेवकान मंगळवारी भरणाऱ्या भर आठवडा बाजारात बंदुकीचा धाक दाखवून एका युवकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना सावंतवाडीत घडली आहे.
दरम्यान, या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी धाव घेतली आहे. पुर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून भर दिवसा, भर बाजारात बंदूकीचा वापर करत दहशत निर्माण करणाऱ्या या लोकप्रतिनिधीवर आता पोलीस कोणती अॅक्शन घेणार ? याकडे सर्वसामान्य नागरिकांच लक्ष लागून राहिले आहे.