
बांदा : बांदा शहरात भर बाजारपेठेत राजन भिसे यांनी आपल्या घरासमोर पार्क केलेल्या ओम्नी कारचे दोन्ही टायर चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गजबजलेल्या परिसरातून टायर चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चोरट्याने गाडीला दगडाचा सहारा देऊन पुढील व मागील असे दोन टायर काढून नेले. भर बाजारात झालेल्या चोरीच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.