देवगड : देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन देवगडचे साहित्यप्रेमी सदानंद पवार यांनी दीपप्रज्वलन करून करण्यात आले. पवार बोलताना म्हणाले ‘ग्रंथ हे ज्ञान मिळविण्याचे ते एक सर्वोत्कृष्ट साधन आहे.वाचनाने आपण समृद्धहोतो.ग्रंथालयातील उत्तोमात्तम ग्रंथांचे वाचन व चिंतन करायला हवे. ग्रंथप्रदर्शन हा उपक्रम स्तुत्य असून वाचनाचा दृढ संकल्प या नववर्षाच्यानिमित्ताने करूया अस आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. गणेश बांदकर, सचिव सीतराम पाटील,संचालक सदस्य दत्तात्रय जोशी,महेश खोत, मधुरा कुबल, गौरव गोगटे तसेच महेश कानेटकर आदी उपस्थित होते. देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते.यावेळी ग्रंथालय आणि शब्दांगण पुणे यांच्या सहकार्याने ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. मा.आ.ऍड अजित गोगटे बोलताणा म्हणाले ‘समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वाचनाचा छंद जोपासायला हवा. ग्रंथप्रदर्शनामुळे विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती होते. ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होते’. असे ते म्हणाले.
शब्दांगणचे हे पुस्तक प्रदर्शन दि. १३ जानेवारी पर्यंत सकाळी १० वा. ते रात्री ८.३० वा. पर्यंत सुरू राहणार आहे.या पुस्तक प्रदर्शनामध्ये विविध विषयांची हजारो पुस्तके ५०% पर्यंत सवलतीत उपलब्ध आहे. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर यांनी सदानंद पवार, ऍड.मा.आ.अजित गोगटे आणि राठीवडेकर यांचे स्वागत केले. ग्रंथपाल श्री प्रशांत बांदकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या शेवटी परूळेकर यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून जास्तीतजास्त लोकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.