'गोकुळ'चा कोटीत बोनस | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादकांची आधीच 'दिवाळी' !

एक कोटी 9 लाख 90 हजार 777 रुपये बोनस सिंधुदुर्ग जिल्हा बँक खाते दूध उत्पादक संस्थांच्या खात्यात जमा
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 12, 2022 22:37 PM
views 502  views

सावंतवाडी : कोल्हापूर जिल्हा सहकार दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ दूध उत्पादक संघाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा दूध उत्पादकांना दिवाळी दसरा बोनस कोटीच्या घरात गेला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 124 दूध संघ कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघाला दररोज दूध वितरित करतात.  जवळपास 22 हजार लिटर दररोज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दूध गोकुळला संकलित होत आहे.  या 22000 लिटर दूध उत्पादनातून एक कोटी नऊ लाख 90 हजार 777 रुपये एवढा बोनस सिंधुदुर्ग जिल्हा बँक खाते दूध उत्पादक संस्थांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.  त्यामुळे यंदा कोटीच्या घरात बोनसची रक्कम गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. 

आतापर्यंतच्या कालावधीत यंदाच दुधामागे एक कोटी रुपये बोनसची रक्कम गेलेली ही पहिलीच वेळ आहे.  त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादन वाढीत आता अग्रेसर ठरत आहे.  दुधाची धवल क्रांती आता गावागावात सुरू झाली आहे.  याचे सर्व श्रेय सिंधुदुर्ग जिल्हा बँक व गोकुळ दूध उत्पादक संघाला विशेष करून जाते.  गोकुळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही एकत्र येऊन काम करत असल्याने आणि गेल्या पाच वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने जिल्हा बँकेने घेतलेले विविध उपक्रम त्याचे हे फलित म्हणावे लागेल.  गतवर्षी जवळपास 78 लाख रुपये एवढा बोनस गोकुळ कडून दूध उत्पादक काना प्राप्त झाला होता यंदा जवळपास 30 लाखाहून अधिक चा बोनस अधिकचा  प्राप्त झाला आहे. 

दरवर्षी गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर यांच्याकडून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वर्षभरातील कालावधीत अंतिम दूध दरापोटी म्हैस व गाईचे दूध खरेदी रकमेवर बोनस देण्यात येतो यंदा म्हैस दुधास व दूध उत्पादकांसाठी संघाने संस्थेकडून खरेदी केलेल्या म्हैस व दुधाचे रकमेवर साधारण शेकडा 4.8 टक्के व संस्थेच्या  खाती साधारण1.8 असे एकूण 6.1% शेकडा बोनस देण्यात आला आहे.  तर गाय दुधास दुधाच्या रकमेवर शेकडा 4.3 तर रोखीने व संस्थेच्या खाती साधारण 1.8 असे एकूण शेकडा 6.2 टक्के देण्यात आले आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 70 ते 60 लाख रुपयापर्यंत बोनस प्राप्त होत होता.  मात्र यंदा कोरोना महामारीनंतर गावागावात दूध संस्था आणि दूध उत्पादक वाढत आहेत त्यामुळे वर्षभरात 22000 लिटर दूध दररोज गोकुळला संकलित होत आहे.  त्यातून वर्षभरात चा दूध उत्पादकांना दुध दर नुसार बोनसची रक्कम कोटीच्या घरात यंदा गेली आहे. 

जिल्ह्यात 136 दूध उत्पादक संस्था आहेत त्यातून १२४ दूध उत्पादक संस्थांना गोकुळच्या मार्फत बोनस वितरित करण्यात आला आहे.  आणि तो 11 ऑक्टोबरला दूध उत्पादक संस्थांच्या खात्यात जमाही करण्यात आला आहे.  आता गावागावातील दूध संस्था शेतकऱ्यांना हा बोनस वाटप करत आहेत.  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ चेअरमन विश्वास पाटील व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दूध उत्पादक संस्थांचे कौतुक केले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोकुळ मार्फत डॉ नितीन रेडकर व सुपरवायझर भगवान गावडे राजेश गावकर यांनी वर्षभरात दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने गावागावात जाऊन संस्थांना प्रोत्साहित केले त्याचे हे फलित आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी,  व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर व संचालक महेश सारंग आधी संचालकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ यांच्या मेहनती हे फळ आहे, अशा शब्दात कौतुक केले आहे. आता खऱ्या अर्थाने धावलक्रांती चे मुहूर्त  स्वरूप आले आहे, असे या बोनसच्या रकमेतून दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  त्याचबरोबर सावंतवाडी तालुका दूध उत्पादक संघ अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर व सचिव एडवोकेट संतोष सावंत, उपाध्यक्ष प्रमोद गावडे, प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषता सावंतवाडी तालुक्यात दूध उत्पादक संघ 37 आहेत आणि यंदा बोनसचे रक्कम प्राप्त झाली त्याबद्दल गोकुळचे आभार मानले आहेत.